बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे पाच टक्के मागतील : नीलेश राणे

0 3

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्तसमोर येत आहे. यावर ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागणार, अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली.

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ६५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्यावतीने या स्मारकासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत.

सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवन विकसित केले जाणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर निविदेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. अद्यापही या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त आज (शुक्रवारी) मिळाले आहे.

यावर नीलेश राणे यांनी ही बातमी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागेल, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More