बहुजन विकास आघाडीची चिन्हासाठी धडपड सुरूच !

0 1

पालघर (प्रतिनिधी) : पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतरही ते मिळावं यासाठी बहुजन विकास आघाडीने फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र, याआधीच कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेऊनही पदरात निराशाच पडली होती. पण तरीदेखील काही सकारात्मक होईल अशी अपेक्षा बहुजन आघाडीला आहे.

सोमवारी पुन्हा एकदा चिन्हावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. थोड्या वेळात या याचिकेवरचा निर्णय पालघर निवडणूक निर्णय अधिकारी भूमिका घेणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील सुनावणीनंतरही बहुजन विकास आघाडीचं कितपत समाधान होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीचं ‘शिट्टी’ हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे ‘बविआ’ला मोठा धक्का बसला आहे. पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानंही ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र, या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहुजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली.

मुंबई हायकोर्टानं वाद निवडणूक आयोगाकडे सोपवत निर्णयाचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण, पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्हं कुणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बहुजन विकास आघाडीला बसणार आहे. तर, फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More