बहुचर्चित राफेल विमाने पुढील महिन्यात हवाई दलाच्या ताफ्यात !

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारने फ्रान्सबरोबर (सप्टेंबर २०१६ मध्ये) ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. या करारानुसार २० सप्टेंबर रोजी फ्रान्स ३६ पैकी काही राफेल विमाने भारताच्या ताब्यात देणार आहे. त्यामुळे भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना चोख प्रतित्तर देवू शकणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणी अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

मिळालेल्या माहितीनुसार, या करारानुसार विमानांचा ताबा घेण्यासाठी केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ फ्रान्सला जाणार आहेत. २० सप्टेंबरला राफेल विमानांच्या पहिली तुकडी भारतीय हवाई दलाला सुपूर्द करण्यात येणार आहे. ही विमाने पारंपारिक पद्धतीने भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राफेल विमानांना भारताच्या ताब्यात देताना दोन्ही देशांमधील प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहे. राफेल विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करुन घेण्यासाठी २४ वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

भारतीय हवाई दल सुरुवातीला या नवीन राफेल लडाऊ विमानांपैकी एक विमान हरियाणा आणि अंबाला येथील एअरबेसवर तैनात करणार आहे. पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी येथे ही विमाने तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर एक राफेल तैनात करण्यात येणार असून चीनच्या सीमेवरील हालचाली लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More