प्रसंगी ‘गोकुळ’चा राजीनामा, पण मंडलिकांना खासदार करणारच : अंबरीशसिंह घाटगे

2 2

गारगोटी (प्रतिनिधी) : प्रसंगी गोकुळ संघाचे संचालक पद गेले तरी चालेल. पण कागलमधून मंडलिकांना मताधिक्य देण्यासाठी झटेन आणि त्यांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार जि.प.सदस्य आणि गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. ते गारगोटी येथे प्रा. संजयदादा मंडलिक यांचे प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गोकुळ ही महाडिकांची जहागिरी नसल्याचेही सांगितले.

घाटगे म्हणाले की, गोकुळच्या गेल्या निवडणुकीत मी आ. सतेज पाटील आणि प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो आहे. घाटगे गट कागलमधून प्रा.संजय  मंडलिकांनाच मताधिक्य देईल. ही निवडणूक आपण विकासाच्या  मुद्द्यावर लढत आहोत. प्रा. संजयदादा मंडलिक यांनी जि.प. अध्यक्ष असताना  दोन वर्षांचा कालावधीत कोल्हापूरचा खूप मोठा विकास केला. माझ्या सिद्धनेर्ली जि.प. मतदारसंघांमध्ये प्रा. मंडलिक यांनी  भरघोस असा निधी दिला आहे. त्यामुळे मी विकास करणाऱ्या माणसासोबत असल्याचे मत व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

2 Comments
  1. Hemant daddikar says

    Dada mi pan tunchya sobat ahe… Fakt mandlik saheb

  2. kothavale sir sulkud. says

    good work and bhvi amdhar

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More