आर्थिक वादातून युवकावर तलवार हल्ला..!

0 2

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  येथील सुधाकर जोशीनगरमध्ये पैशाच्या देवाण- घेवाणीतुन झालेल्या तलवार हल्ल्यात एकजण जखमी झाला. मल्लिकार्जुन श्रीपती चिकदुळ (वय ३०, रा. संभाजीनगर) असे या जखमीचे नाव आहे. आज (गुरुवार) ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय बिदरे (वय २५, रा. नाळे कॉलनी) याला अटक केली आहे.

संभाजीनगर परिसरातील जोशीनगर येथे राहणाऱ्या मल्लिकार्जुन चिकदुळ याचा आणि संशयित आरोपी अक्षय बिदरे या दोघांमध्ये पैशांचे काही व्यवहार झाले होते. दरम्यान आज सकाळी पैशाच्या देवाणघेवाणीतून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. यामध्ये अक्षयने तलवारीने मल्लिकार्जुन याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मल्लिकार्जुनने वार चुकवण्यासाठी हात आडवा केला. त्यामुळे हातावरच तलवारीचा वार झाल्याने त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली.

या वेळी मल्लिकार्जुनने आरडाओरड केला असता परिसरातील लोक जमा झाल्याने अक्षयने पळ काढला. मल्लिकार्जुन याला जखमी अवस्थेत भागातील नागरिकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सदाशिव चिकदुळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित अक्षय बिदरे याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More