पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी…

0 4

पावसाळ्यामध्ये शरीराच्या आरोग्यबरोबर केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांचे सौंदर्य बिघडल्याने व्यक्ती सौंदर्य पूर्णपणे बिघडते. त्या व्यक्तीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टी खूपच आगळीवेगळी असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. यासाठीच केसांचे सौंदर्य जपणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ऋतू आणि हवामान बदलाचा केसांवरही परिणाम होतो. केसांचा पोत, सौंदर्य पावसाळ्यात उत्तम प्रकारे जपण्यासाठी काय करावे याविषयी जाणून घेवू या…

पावसाळा सुरू झाल्यास शक्यतो वेगवेगळ्या हेअर स्टाइल करणे टाळावे. जरी हेअर स्टाइल करायची असेल तर हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर पावसाळ्यात करणे टाळा, केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. आठवड्यातून दोन वेळा केस धुऊन एकदा कंडिशनर लावावे, पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणे. तसेच सतत आयनिंग करणे टाळावे, पावसाळ्यात केस ओले झाले असल्यास मोठ्या दातांचा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा. त्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत.

पावसाळ्यात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. या वातावरणातील ओलावा, आर्द्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे दोन वेळा तरी केस धुवावेत, केसांना १५ मिनिटे लिंबाचा रस लावून केस धुतल्यास केसांचा तेलकटपणा तसेच केस चिकट होणार नाहीत. केस भिजले असल्यास लगेच बांधू नयेत. यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते, पावसाळ्यातील प्रवासात केस भिजले असेल तर लगेच स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More