‘पंतप्रधानपदासाठी एकवेळ मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना नाही…’

0 2

सोलापूर (प्रतिनिधी) : भाजपविरहित सत्ता स्थापन करण्यासाठी एकवेळ पंतप्रधानपदासाठी मायावती यांना पाठिंबा देऊ, मात्र शरद पवारांना आमचा कट्टर विरोध आहे, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये इतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली. आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. 

आपला पक्ष कुणाहीसोबत जाणार नाही, मात्र कुणालाही आपल्या पक्षासोबत यायचं असेल तर आपल्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. लोकसभेच्या पाचव्या आणि सातव्या टप्प्यात मोदींना सत्ता हातातून जातेय की काय, अशी भीती वाटत असल्यानेच आता निवडणुकीत मोदी वैयक्तिक टीका करत असल्याचेही त्यांनी म्हटलंय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More