पंतप्रधानपदावरून काँग्रेसची आश्चर्यकारक कोलांटउडी…

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान अद्याप बाकी आहे. मात्र कोणालाच बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून विरोधी पक्षांची एकजूट करायचा काँग्रेसचा मनसुबा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान करण्यासाठी आसुसलेल्या काँग्रेसने आता सावध पवित्रा घेतला आहे. ‘एकवेळ काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी चालेल, पण ‘एनएनडीए’ला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे,’ असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

निकाल लागण्याआधीच पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर पंतप्रधानपदाचा विचार करेन, असं याआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं. पण आता गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे जे पक्ष यूपीए आणि एनडीएचा (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More