पंढरपुरात विठुरायासाठी आंब्यांची आरास

0 2

पंढरपूर (प्रतिनिधी) : विठ्ठल- रुक्मिणीचे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. अनेक भाविक विठुरायाचे मंदिर विविध फुलांनी सजवतात. अशाच एका भक्तानं मंदिराला ११ हजार आंब्यांनी सजवलं आहे. विठुरायासाठी आंब्यांची आरास केली आहे. त्यामुळं मंदिराला आमराईचं स्वरुप आलं आहे

पुणे येथील विनायक काची या भाविकाने रत्नागिरी येथून आणलेल्या ११ हजार आंब्यांनी मंदिराची सजावट करण्यास सुरुवात केली. मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि विनायक काची यांनी १०० कलाकारांच्या मदतीने ही सजावट केली आहे. या सजावटीमुळे मंदिर परिसर हापूस आंब्याच्या सुंगंधाने दरवळून गेलं आहे. संपूर्ण मंदिर पिवळ्या-केशरी आंब्यांनी नटलं आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी सभामंडप सर्व आंब्यानी सजवलं आहे. पहाटे महापूजा आणि काकडा आरती झाल्यानंतर देवाला गुलाबी अंगी, पिवळ्या रंगाचे सोवळे असे वस्त्र नेसवले आहे. विठुरायासाठी सजवलेली आंब्यांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More