नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा दणका : जामीन नाकारला

0 2

लंडन (वृत्तसंस्था) :  हिरे व्यापारी नीरव मोदीला आज (बुधवार) सलग चौथ्यांदा लंडनमधील न्यायालयाने दणका दिला. लंडनमधील हायकोर्टाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्याला आता आणखी काही काळ तुरुंगात रहावे लागणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून नीरव मोदी लंडनमध्ये पळाला होता. मार्च महिन्यात नीरव मोदीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी नीरव मोदीच्या वतीने तीन वेळा जामीन अर्ज करण्यात आला. मात्र, लंडनमधील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

अखेर त्याने ब्रिटनमधील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. आज  दुपारी नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने प्रकृतीचे कारण देण्यात आले होते. पण न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More