निष्णप प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरवात : आ. प्रकाश आबिटकर

0 1

गारगोटी (प्रतिनीधी) : निष्णप लघुपाटबंधारेच्या कामाला यश आले असून या प्रकल्पाला १६ कोटी ४७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच मंत्री महोदयांच्या उपस्थितीत गावात गुढ्या उभारून वाजत-गाजत उद्घाटन सोहळा करुन कामास सुरवात करु. या प्रकल्पांतर्गत अंदाजे १६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे निष्णप, पारदेवाडी, करडवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनीस  पाणी मिळणार असल्याचे आ. प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यावेळी निष्णपच्या ग्रामस्थांनी आ. आबिटकर यांचा सत्कार केला.

यावेळी धरण कृती समिती अध्यक्ष दगडू राऊळ म्हणाले,  धरण होण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीकांना रास्ता रोको, आंदोलने, आमरण उपोषण केले. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आ. आबिटकर यांनी रखडलेला प्रकल्प मार्गस्थ लावण्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.  

यावेळी  पं.स. सदस्य सुनिल निंबाळकर, निष्णप सरपंच भारती पाटील,  विष्णू राऊळ, मारुती राऊळ, ग्रा.पं.सदस्य मारुती कांबळे, संदीप राऊळ, पांडूरंग तेलंग, सदाशिव बेलेकर,  प्रकाश बेलेकर, सर्जेराव सोनाळकर, रमेश राऊळ, दगडू पाटील, रामचंद्र पाटील, दत्तात्रय हरी पाटील यांच्यासहीत मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More