नारायणपूरमध्ये पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान : दोन जवान जखमी

0 2

नारायणपूर (वृत्तसंस्था) :   छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात अबूझमाड परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक आज (शनिवार) सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये दोन जवानदेखील जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याला बस्तरचे आयजी विवेकानंद सिन्हा यांनी या वृत्तास अधिकृतरित्या दुजोरा दिला आहे.

ओरछा-गुमरकाच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चमकम झाली. या परिसरात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली असताना,  नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवळपास तासभर ही चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. या चकमकीनंतर नक्षलवाद्यांचे मृतदेहदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More