‘नमामि पंचगंगे’चा चिखली येथे वर्षपूर्ती कार्यक्रम : शौमिका महाडिक

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीरनगरीच्या प्राचीन ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार पंचगंगा सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे. उद्या (बुधवार) शुद्ध जेष्ठ दशमी गंगावतरण दिवसाला ‘नमामि पंचगंगे’ या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून उद्या सकाळी वर्षपूर्तीनिमित्त चिखली येथे पंचगंगेच्या काठावर सकाळी सात वाजता ‘नमामि पंचगंगे स्वच्छता’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज (मंगळवार) दिली.

शौमिका महाडिक म्हणाल्या की, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी आणि  परिक्रमेसाठी २४ मे २०१८ रोजी नमामि पंचगंगे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याची उद्या वर्षपूर्ती होत आहे. त्यासाठी सर्व व्यापक स्वरुपाचा अभ्यास करून एक नियोजनबद्ध कार्यक्रम वर्षभर राबवण्यात आला. पंचगंगा नदीकाठ परिसराची श्रमदानातून स्वच्छता करुन या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. एक वर्षाच्या कालावधीमध्ये ‘नमामि पंचगंगे’ या उपक्रमाच्या माध्यमातून पंचगंगेसाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना एक सदृढ व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले.

या महत्वकांक्षी प्रकल्प उपक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. अमल महाडिक यांचे मार्गदर्शन मिळाले, त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरामध्ये लोकसहभाग आणि प्रशासनाचा सहभागाद्वारे पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी विविध उपक्रम पार पडले गेले. बाजार भोगाव, आमशी येथे जि.पच्या स्वनिधीतून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यात आला. नदीकाठावरील १७४ गावांमध्ये गणेश मूर्त्या, निर्माल्य संकलन करण्यात आले.

या वर्षपूर्ती कार्यक्रमाला सर्व प्रशासन कर्मचारी,लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सेवा संस्था आणि समस्त लोकांनी हजर राहून सहकार्य करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्षा सौ. शोमिका महाडिक यांनी केले.

यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, उपमुख्य जलस्वराज्य अधिकारी सौ. प्रियदर्शनी मोरे  हजर होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More