धामोड परिसरातून संजय मंडलिक यांना मताधिक्य देणार : बाळासाहेब नवणे

0 3

धामोड (प्रतिनिधी) : धामोड परिसरातून आणि राधानगरी तालुक्यातून प्रा. संजय मंडलिक यांना जादा मताधिक्य देणार, असे प्रतिपादन सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे यांनी केले. ते आज (शनिवार) धामोड येथे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित आण्णासाहेब नवणेप्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. धामोडचे सरपंच अशोक सुतार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

आ. प्रकाश आबिटकर म्हणाले की, खासदारांनी ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही त्यामुळे या खेडय़ापाडय़ातील सुज्ञ मतदारांच्या जिवावरच संजय मंडलिक संसदेत पोहोचतील.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, स्व.नवणे आण्णांच्या विचारांनी चालणारी येथील जनता आहे. तितकेच प्रेम स्व मंडलिक साहेबांना येथील जनतेने दिले आहे. आण्णांच्या विचाराने आणि मंडलिक साहेबांच्या कार्यकाळात सुरू झालेला धामणी प्रकल्प अजून अपूर्ण आहे. लोकसभेमध्ये माझा पहिला प्रश्न ‘धामणी धरण’ यावर असेल. 

या वेळी दीपसिंह नवणे, शामराव पाटील (चांदे) यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, सह्याद्री साखर कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील ग्रा. पं. सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More