धामणी खोऱ्यातील ‘एकजूट’ कोणाला ठरणार ‘भारी..?

0 2

कोल्हापूर (सुरेश पाटील) : गेल्या वीस वर्षांपासून धामणी खोऱ्यातील प्रकल्पग्रस्त नागरीकांना राजकीय पक्षांनी आश्वासने दिली होती. कित्येक वर्षांपासून पक्ष आणि नेत्यांना आश्वासनांची मोठी किड लागली आहे. आश्वासने द्यायची आणि निवडणुका जिंकायच्या, त्यानंतर गावाकडे पुन्हा पाच वर्ष ढुंकूनही बघायचं नाही. हा प्रकार आता इथून पुढच्या निवडणुकीत चालणार नाही, हे काल झालेल्या लोकसभेच्या मतदानावरच स्पष्ट दिसले. धामणी खोऱ्यातील २५ हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालून आपली ताकद आणि एकजूट दाखवून दिली आहे.

निवडणूका लागल्या की राजकीय नेते मंडळी मोठ-मोठी भाषणे करून आश्वासनांची खैरात करायची. निवडणूका लागल्या की भाषणे करुन आश्वासनांची खैरात करायची. आम्हाला कोण विचारतय या अविर्भावात नेत्यांची ही जणू मक्तेदारीच झाली आहे. पण धामणीतील ग्रामस्थांनी त्यांना दाखवून दिले की लोकशाही काय असते. लोकशाहीमध्ये जर आम्हाला न्याय मिळत नसेल, तर मतदारांना मतदानाचा अधिकार काय कामाचा असा जळजळीत प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. गेली वीस वर्षे तालुक्यातील गावांना प्रकल्पापासून वंचित ठेवले आहे. यामुळे मतदानावर बहिष्कार टाकून या अन्यायग्रस्त नागरीकांनी राज्यकर्ते आणि प्रशासन या दोघांनाही निवडणूकीच्या निमित्ताने जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये उमेदवारांनी या मतदारांचा कौल आपल्याकडे वळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाने मात्र आपला प्रयत्न शेवटपर्यंत सोडला नाही. स्वतः जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांनी या प्रकल्पग्रस्तांची भेट घेवून शासकीय पातळीवर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देतानाच मतदानावर बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी मतदानावर सामुदायिक बहिष्कार टाकता येणार नाही. आणि तसा कोणावर दबावही आणता येणार नाही, असा इशारा दिला होता. तरीही या मतदारांनी आमचे प्रत्येकाचे बहिष्कार टाकण्याचे स्वतंत्र मत असल्याचे कृतीतून दाखवून दिले. यामुळे राज्यकर्ते आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणेला अपयश आले.

राधानगरी तालुक्यातील गवशी, कानोली, म्हासुर्ली, सावंतवाडी, पन्हाळ्यातील वेतवडे, आंबर्डे, हरपवडे, निव्याचीवाडी, पनोरे, कळकवाडी त्याचबरोबर गगनबावडा तालुक्यातील कडवे, बावली, गोरीवडे, जरळी,  शेळोशी, खेरिवडे, धुंदवडे या गावातील मतदारांनी चार महिन्यांपूर्वीच मतदान न करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही केला. जो पर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणूकीला मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. एकंदरीत या ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार कोणत्या उमेदवाराला भारी पडणार हे येणारा काळचं ठरवेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More