‘त्या’ कृतीबद्दल खासदार माने यांना कार्यकर्त्यांनी विचारला जाब !

4 4

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजू शेट्टी यांचा पराभव करणाऱ्यांना सोडायचे नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने दिला होता. यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  असे असताना नूतन खासदार धैर्यशील माने यांनी मात्र बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी त्यांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मात्र ही कृती शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचली नाही. त्यांनी थेट खा. माने यांनाच जाब विचारला. पण ही आपली मराठी संस्कृती आहे, असे सांगत खा. माने यांनी सर्वांची समजूत काढली.

खा. धैर्यशील माने यांनी बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला. माने यांची ही कृती शिरोलीतील शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांसह आवडली नाही. तसेच काँग्रेसचे असूनही माने यांना निवडणुकीत मदत केलेल्या सरपंच शशिकांत खवरे यांच्या कार्यकर्त्यांना हे रुचले नाही. याबाबत खवरे यांनी स्वत: नाराजीचा एक मजकूर तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा मजकूर खासदार माने यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते स्वत: आज (गुरुवार) सकाळी सरपंच शशिकांत खवरे यांच्या घरी आले.

या ठिकाणी शशिकांत खवरे, शिवसेनेचे मुकुंद नाळे, संतोष बाटे, शिवाजी पोवार, भाजपचे सतेज पाटील, संदीप पोर्लेकर यांनी खासदार माने यांना राजू शेट्टी यांच्या घरी जाण्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानाची लढाई आणि पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. खवरे यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकता असताना आपला प्रचार करुन निवडून आणले आहे. असे असताना आणि राजू शेट्टी हे सर्वांशी मग्रुरीने वागून तुमच्यावरही जहरी टिका केली असताना तुम्ही त्यांच्याकडे का गेला असा जाब विचारला.

यावर खासदार धैर्यशील माने यांनी ही आपली मराठी संस्कृती आहे. थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेणे हे संस्कार आहेत. त्यांनी माझ्याबरोबर आमच्या कुटुंबियावर केलेल्या टिकेने आम्हीही व्यथित झालो होतो. तरीही निवडणूका संपल्या की मताचे राजकारण संपावे, वैरत्व कायम मनात ठेवू नये, अशी खिलाडू वृत्ती घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. कार्यकर्ता म्हणून मी आपल्या भावना समजू शकतो. मी संपूर्ण मतदारसंघाचा खासदार आहे. माझ्या या कृतीचे संपूर्ण देशात स्वागत झाले आहे. आपणही गैरसमज करुन घेऊ नका, असे सांगितले.

या वेळी विठ्ठल पाटील, सरदार मुल्ला, अविनाश कोळी, संभाजी भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

4 Comments
 1. Ravi Kulkarni says

  खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे यातून त्यांचा सुसंस्कृतपणा आणि सभ्यता दिसून आली पण काही जणांनी त्यांच्यावर जी नाराजी व्यक्त केली याबद्दल ती चुकीची आहे लोकप्रतिनिधींना खाजगी आयुष्य सुद्धा असतं त्यांनी एखाद्या पुढे आदरानं नतमस्तक झालो तर कार्यकर्त्यांनी का नाराज व्हावे यापेक्षा त्यांनी माने यांचा गुण उचलून तसं वागण्याचा प्रयत्न करावा हेच योग्य ठरेल

 2. मनोहर कोळी says

  यालाच राजकारण म्हणतात

 3. प्रा. एन. एस. पाटील says

  खासदारांची क्रुती योग्यच.

 4. संजय चौगुले- PROSOFT says

  माननीय धैर्यशील माने यांची कृती योग्यच……
  मराठी संस्कृती,संस्काराचे हे प्रतीक आहे.त्यांच्यातील सभ्यता ही निवडणुकीच्या प्रथम दिवसापासून सर्वांनी अनुभवली आहे.भेटीमध्ये कोणतेही राजकारण नाही व नको.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More