तृणमूल काँग्रेसला धक्का : ६० नगरसेवकांसह २ आमदार भाजपमध्ये !

0 1

कोलकता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना हादरा बसला आहे. पक्षाच्या ६० नगरसेवकांनी आणि दोन आमदारांनी आज (मंगळवार) भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय डाव्या पक्षांमधील एका आमदारानेही भाजपात प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून यात तृणमूल काँग्रेसने २२ तर भाजपाने तब्बल १८ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला दोन जागा मिळाला.

२०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे फक्त दोन खासदार होते. भाजपाची यंदाची कामगिरी तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसमधील नेतेमंडळी भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे दिसते.

आज (मंगळवार) सुभ्रांशू रॉय, तुषारक्रांती भट्टाचार्य आणि डाव्या पक्षांमधील आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपात प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील आमदार भाजपात जात असल्याने पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात तृणमूल विरुद्ध भाजपा हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More