टोप येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

0 1

टोप (प्रतिनिधी) :  जिद्द ,चिकाटी, आत्मविश्वास अन प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केले तेच भविष्यात शासकीय अधिकारी होऊन टोप गावचे नाव पंचक्रोशीतच मोठे करतील, असे मत पं.स.सदस्य डॉ. प्रदीप पाटील यानी आज (सोमवार) व्यक्त केले. 

टोप गावातील दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळवेलेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. पाटील यांच्या हस्ते त्यांच्या घरी जाऊन कऱण्यात आला. हा गावातील पहिलाच उपक्रम होता. यावेळी ते बोलत होते. यामध्ये अंकिता सहाणी ९३.२०%, अनिकेत पुजारी ९१.६०%, सई कुंभार ८७.२०%, सानिका मुळीक ८६.२०%, माहीणी मुळीक ८३.४०% या विद्यार्थ्यांचा समावेश होता. पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरामध्ये जाऊन त्यांना पेढे भरवले व पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सत्कार केला. यामुळे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना आनंदाचा धक्काच बसला.

यावेळी पाटील यांनी मुलांना प्रोत्साहन मिळावे तसेच पुढे उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाची ग्रामस्थांनी प्रशंसा केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More