ज्येष्ठ कलादिग्दर्शक शरद पोळ यांचे निधन

0 3

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलादिग्दर्शक शरद पोळ यांचे निधन झाले. आज (शनिवार) मुंबईत त्यांनी ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्या अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शक म्हणून शरद पोळ यांनी काम केले होते.

पोळ यांना तब्बल १० वेळा राज्य पुरस्कारचा सर्वोकृष्ट कलादिग्दर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.  त्यांनी ९० मराठी आणि ६० हिंदी चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले आहे. सुधीर फडके निर्मित स्वातंत्र्यवीर सावरकर, अशी ही बनवाबनवी, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, हिंदीत ज्वेल थीफ,  ईश्वर या चित्रपटांच्या कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More