जेष्ठांच्या सेवेसाठी सिटीझन केअर अभ्यासक्रम…

0 4

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर घरातील जेष्ठांच्या आजारपणात सुश्रूषा व उपचार करण्यासाठी सर्टिफेकेट कोर्स इन डिसेबल्ट सिनियर सिटीझन केअर हा अभ्यासक्रम ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट आणि जेरीयाट्रीक सोसायटी ऑफ इंडिया यांच्यावतीने सुरु केला असल्याची माहिती निलीमा पाटील आणि स्वरुपा कोरगांवकर यांनी आज (मंगळवार) दिली.

जेष्ठ व्यक्तींना त्यांच्या आजारपणात घरातील व्यक्तींच्याकडून कामाच्या व्यापात सेवा, सुश्रुषा करणे अशक्य असल्यास बाहेरील व्यक्तीकडून योग्य प्रकारे घरगुती स्वरुपात सुश्रुषा व उपचार व्हावेत, यासाठी ट्रस्टने तीन महिन्याचा कोर्स सुरु केला असून यामध्ये जेष्ठांचा एकाकीपणा दुर करणे, न्यूनगंड, नैराश्य, मानसिक व शाररिक परावलंबीत्व, अकार्यक्षमता यावर जेष्ठांची सेवा कशी करावी, आहार कसा द्यावा, मसाज, व्यायाम कसा करावा, अंथरुणावर खिळून असलेल्या रुग्णांची योग्य काळजी कशी घ्यावी याचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन या कोर्समध्ये समाविष्ट आहेत.

तसेच पंधरा दिवसांचे प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशाप्रकारे कोर्सकरुन सुश्रुषा आणि अर्थार्जन करण्याची संधीही या कोर्समुळे उपलब्ध झाली आहे. वीस एप्रिलपासून शाहुपुरी तिसरी गल्ली येथील लक्ष्मीविष्णु होमिओपॅथीक हॉस्पिटल-सांज निवारा येथे हा कोर्स सुरु होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More