जेट एअरवेजच्या वैमानिकांचे मोदींना साकडे

0 1

मुंबई (प्रतिनिधी) :  आर्थिक संकट कोसळल्यानं ‘जमिनीवर’ आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेनं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी १५०० कोटी रुपयांची निधी तातडीनं उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे. तर कंपनीतील २० हजार नोकऱ्या वाचवा, असं साकडं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातलं आहे. 

जानेवारीपासूनचे वेतन थकल्याने हतबल झालेल्या या कंपनीच्या वैमानिकांनी ‘उड्डाण बंद’ आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. पण, कंपनीचे आर्थिक नियोजन करणाऱ्या स्टेट बँकेशी चर्चा करण्याचे आश्वासन वैमानिकांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचे वैमानिकांनी ठरवले असल्याचे नॅशनल एव्हिएटर्स गिल्डचे उपाध्यक्ष आदिम वालियानी यांनी सांगितलं. 

जेट एअरवेजच्या ताफ्यातील ११९ पैकी १०८ विमाने आर्थिक संकटामुळे जमिनीवर आहेत. उर्वरित ११ विमानांच्या माध्यमातून एकूण ५२ उड्डाणे देशभरात सुरू आहेत. त्यापैकी मुंबईहून दिल्लीसाठी तीन व अमृतसरसाठी एक सेवा सुरू आहे. वैमानिकांनी काम बंद केल्यास ही मोजकी उड्डाणेही बंद होतील. कंपनीने सध्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आहेत. मुंबई-पॅरिस थेट सेवेला आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद होता. पण, आर्थिक बोज्यामुळे त्या सेवेसह ‘सार्क’ व ‘आसिआन’ देशांच्या सेवादेखील कंपनीने १० जूनपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More