जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेतील प्रवेश शुल्क वाढ रद्द करा : मागणी

0 2

कसबा तारळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा विभागाकडून शालेय क्रीडा स्पर्धेतील प्रवेश शुल्कामध्ये वाढ करण्यात आली होती. ही वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राधानगरी तालुका क्रीडा असोसिएशनच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्याकडे देण्यात आली. यावेळी आ. प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

आ. आबीटकर यांच्या मध्यस्थीने शालेय क्रीडा स्पर्धेची फी कमी करण्याची ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली. त्याचबरोबर प्राथमिक प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ऐवजी ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राधानगरी तालुका क्रीडा समन्वयक बी. एस. जठार, भुदरगड क्रीडा समन्वयक संजय मोरे, आर. डी. पाटील, एन. एस. पाटील, व्ही. टी. पाटील, आर. बी. पाटील, सुनिल संकपाळ, सावंत, कासार,  रमेश मुसळे, चौगले, वैशाली पाटीलसह राधानगरी,  भुदरगड तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More