जवाहरलाल नेहरूंमुळेच आजची लोकशाही जिवंत : राहुल गांधी

0 2

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या संस्थांमुळेच आज ७० वर्षांनंतरही भारतात लोकशाही जिवंत असल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज ५५ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने आज (सोमवार) राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी शांतिवन या नेहरुंच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भारतासोबत लोकशाही व्यवस्थेची वाटचाल सुरुवात केलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये आता हुकूशाही आली आहे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निर्माण केलेल्या खंबीर, स्वायत्त आणि आधुनिक संस्थांमुळे आज भारतातील लोकशाही जिवंत असल्याचे म्हटले आहे.

मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हुकूमशाही आणू पाहत असल्याची टीका काँग्रेसकडून नेहमीच होत असते. लोकसभा निवडणुकीतही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास संविधानाला धोका निर्माण होईल, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. भाजपच्या काळात अनेक स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य हिरावले गेल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातही विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकार त्यांच्यावर दबाव आणत असल्याची टीका केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More