जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल २८ रोजी

0 1

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावमधील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी आज (शुक्रवार) न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी न्यायालय २८ जून रोजी निकाल देणार आहे. माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यासह ४० हून अधिक जण या खटल्यातील आरोपी आहेत.

घरकुल घोटाळ्याचे कामकाज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे विशेष न्यायालयात स्थलांतरीत करण्यात आले असून आज (शुक्रवार) या खटल्याची सुनावणी झाली. या सुनावणीला सुरेश जैन, गुलाबराव देवकर हे अनुपस्थित होते. न्यायालयातील सुनावणी आज (शुक्रवार) पूर्ण झाली असून न्यायालय या प्रकरणी २८ जून रोजी निकाल देण्याची शक्यता आहे.या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सुरेश जैन यांच्यासह खांदेश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांचा समावेश आहे

या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सुरेश जैन यांच्यासह खांदेश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांचा समावेश आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More