जळगावात मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या

0 1

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावमधील मनसेचे कार्यकर्ते श्याम दीक्षित यांची  हत्या झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. या हत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, जळगाव पोलील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, असून तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, श्याम दीक्षित हे काल (शनिवार) रात्री काव्यरत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री १२.३० वाजता ते घरी आले. त्यावेळी त्यांना मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर ते घराजवळील कृपाळू साईबाबा मंदिराजवळ आले. तिथेच रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
सकाळी रस्त्याने जाणाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला असता, गल्लीतील काही लोकांनी हा प्रकार त्यांच्या घरी कळविला. आई व बहीण धावतच तिथे पोहचल्या. श्यामला पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More