जरगनगर येथे शाळकरी मुलीची गळफास लावून आत्महत्या…

0 2

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चुलत्याच्या घरी राहण्यासाठी आलेल्या १६ वर्षीय शाळकरी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज (रविवार) सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. वैष्णवी पांडुरंग माने (वय १६,  रा. कडवे वाणीपेठ, ता.शाहूवाडी) असे तिचे नाव आहे. याची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे वैष्णवी पांडुरंग माने ही राहते. ती मलकापूर गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत होती. सुट्टीनिमित्त ती कोल्हापूर जरगनगर येथे राहत असलेले चुलते शशिकुमार माने यांच्या घरी काल (शनिवार) राहण्यासाठी आली होती. रात्री ती एका खोलीत झोपण्यासाठी गेली होती. आज तिच्या चुलत्यांनी तिला उठवण्यासाठी हाक मारली. मात्र,  आतमधून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने, माने यांच्या घरातील लोकांनी दरवाजा तोडला.

त्यावेळी वैष्णवीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, नातेवाईकांनी तात्काळ बेशुद्ध अवस्थेतेतील वैष्णवीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत करवीर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मात्र, वैष्णवीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. वैष्णवीने आपले जीवन संपवल्याने तिच्या आई, वडीलांना मोठा धक्का बसला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More