जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या…

0 6

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.   देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मिरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी) रात्री तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. छातीत तीन, तर पोटात दोन गोळ्या लागल्यामुळे मीर यांचा मृत्यू झाला.

६० वर्षीय गुल मोहम्मद मीर हे जम्मू काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष होते. त्यांनी जम्मू काश्मिर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. हत्याकांडानंतर पोलिसांनी नौगाम परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला. या घटनेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More