छ. शिवाजी महाराज हे सर्वसामान्य जनतेचे उर्जास्रोत : समरजितसिंह घाटगे

0 1

मुरगूड (प्रतिनिधी) :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी  इतिहास सर्वच पिढयांना मार्गदर्शक ठरला आहे. छत्रपती हे सर्वसामान्य जनतेचे उर्जास्रोत असल्याचे, प्रतिपादन म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले. ते शिवराज्याभिषेक दिनानिमित बोलत होते.

यावेळी मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूड नगरपरिषदेचे पक्षप्रतोद जयसिंगराव भोसले होते.

घाटगे म्हणाले की, शिवरायांचे आचार आणि विचारांचे वृत्तीत रुपांतर होण्यासाठी कृतीची जोड द्यायला हवी. महाराजांचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी असून त्यांच्या शौर्यगाथे बरोबरच त्यांचा इतिहास नव्या पिढीने नेहमी अभ्यासायला हवा, अशी अपेक्षाही समरजीतसिंह घाटगे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे, माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, रामभाऊ खराडे, नगरसेविका सौ. रेखाताई मांगले, सौ. रंजना मंडलिक, किरण गवाणकर,   डी. डी. चौगले, छोटू चौगले, सुभाष अनावकर, बाजीराव खराडे, प्रविण दाभोळे, सोमनाथ येरनाळकर, विकास सावंत, विजय गोधडे यांच्यासहीत शिवभक्त उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More