चारच दिवसात रुंदावली ‘मिशन मंगल’च्या कमाईची कक्षा !

0 1

मुंबई (प्रतिनिधी) : अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मिशन मंगल’ स्वातंत्र्य दिनादिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईला जोरदार सुरुवात झाली. सलग चौथ्या दिवशी ‘मिशन मंगल’ने ९७.५६ कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एक ट्विटद्वारे दिली.

तरण आदर्श यांनी ‘मिशन मंगल’ च्या विक्रमी घोडदौडमुळे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत असल्याचे म्हटले आहे. मिशन मंगलमध्ये अक्षय कुमार इस्रो वैज्ञानिक ‘राकेश धवन’ ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तर, विद्या बालन (तारा शिंदे), तापसी पन्नू (कृतिका अग्रवाल), नित्या मेनन (वर्षा पिल्लई), शरमन जोशी (परमेश्वर नायडू) आणि अनंत अय्यर (एचजी दत्तात्रेय) या कलाकरांच्याही अभिनयाची आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांची जोड मिळाली आहे.  

या कमाईच्या आकड्यांचा हा वेग कायम राहिल्यास शंभर कोटींची सीमा ओलांडण्यास फार वेळ लागणार नाही. मुख्य म्हणजे दणदणीत सुरुवात मिळालेला खिलाडी कुमारचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीनेही ही अत्यंत प्रशंसनीय बाब ठरली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More