गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेच्या कर्जाचा व्याजदर सर्वात कमी : प्रकाश पाटील

0 3

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेच्या कर्जावरील व्याजदर सर्व सहकारी बँकेपेक्षा कमी म्हणजे ११ टक्के इतका आहे. बँक लवकरच मोबाईल बँकींग, नेट बँकिंग सुरु करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आज (शनिवार) झालेल्या सर्वसाधरण सभेत सांगितले.

बँकेचे १०२ वी वार्षिक सर्वसाधरण सभा प्रतिभानगर हौसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये खेळीमेळीत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सभासद आणि संचालक मंडळाने विश्वास दाखवून सहकार्य केल्याबद्दल आभार मानून सलग नऊ वर्षे शून्य टक्के एनपीए राखणे तसेच १ कोटी ९७ लाख इतका विक्रमी नफा मिळवणे शक्य झाले असल्याचे सांगितले.

अहवाल सालात बँकेला अ वर्ग आणि रिझर्व्ह बँकेचा ग्रेड १ चे मानांकन प्राप्त झाले आहे. सभासद आणि ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग आणि कोअर बँकिंग प्रणालीद्वारे कोणत्याही शाखेमधून व्यवहार करणे सुलभ झाले आहे.

संचालक प्रकाश आमते आणि अरुण शिंदे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याबरोबरच बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार, आर्थिक सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असणारी बँक, शून्य टक्के एनपीए असणारी बँक यासाठी सन्मानित केले आहे. तसेच माजी अध्यक्ष रविंद्र पंदारे यांना सर्वोत्तम अध्यक्ष, सुरेश शिंदे यांना बेस्ट सीईओ या पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बँकेचे संचालक अतुल जाधव आणि विलासराव कुरणे यांनी पूरपरिस्थितीमध्ये सलग आठ दिवस बचावकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष भरत पाटील, संचालक मधुकर पाटील, शशिकांत तिवले, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, हेमा पाटील, नेहा कापरे, संजय सुतार, जयदीप कांबळे, बाळासाहेब घुणकीकर, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे, सभासद उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More