गडहिंग्लज येथे मंगळवारी महारक्तदान शिबिर…

0 2

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे मंगळवार (दि.२७ ) महारक्तदान शिबिराचे आयोजन गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता केदारी रेडेकर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणार आहे. अशी माहिती केदारी रेडेकर समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडकर यांनी दिली.

अनिरुद्ध रेडेकर म्हणाले, कोल्हापूर जिल्हातील पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी एक हात मदतीचा म्हणून गडहिंग्लज येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पुरपरिस्थिती ओसरत असताना लोकांच्या आरोग्याच्या समस्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांना रक्ताची गरज भासत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान करण्यास यावे, असे आवाहनही यावेळी केले. तसेच फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान करण्यासाठी येणाऱ्यांना आकर्षक गिप्ट देणार असल्याचेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More