गडहिंग्लज येथे धूम स्टाइलने वृद्धाची सोनसाखळी लंपास…

0 2

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने वृद्धाची सुमारे दीड तोळ्याची सोनसाखळी हिसडा मारून लंपास केल्याचा प्रकार गडहिंग्लज येथे गुरुवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी चंद्रकांत नागाप्पा बंदी (वय ६५, रा. संकेश्वर रोड, गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चंद्रकांत बंदी हे शेती करतात. ते काल संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास सायकलवरून घरी निघाले होते. गडहिंग्लज येथील मायाक्का कॉप्लेक्सजवळ आले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि त्वरित पलायन केले. ही सोनसाखळी दीड तोळ्याची असून त्याची सध्याची किंमत २०००० रु. इतकी आहे. गडहिंग्लज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More