खा. महाडिकांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे : चेतन नरके

0 5

बाजार भोगाव (प्रतिनिधी) : प्रत्येक कार्यकर्ता आपल्या  आवडत्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी धडपडत आहे. महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे सुपुत्र चेतन नरके यांनी केले. ते काळजवडे येथे बोलत होते. यावेळी चेतन नरके यांनी बाजार भोगाव मतदारसंघाचा दौरा केला.  

चेतन नरके म्हणाले, अरूण नरकेंनी आपल्या आयुष्यातील ४३ वर्षे घालवून गोकुळ सारखा संघ मोठा केला. माझा मुलगा महाराष्ट्रातच शिकला पाहिजे तो थायलंडला का शिकू नये. गोकुळचे दूध सिंगापुर, थायलंड येथे गेले तर काय वाईट आहे. अरुण नरकेंनी हजारो जणांना नोकऱ्या दिल्या. पण कधी कोणाचा एक रुपयाही त्यांनी घेतला नाही. म्हणून आपल्याला जर अरुण नरके गट टिकवायचा असेल तर लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी करुया, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ग्रा.पं.सदस्य आनंदा कांबळे, प्रकाश पाटील, अनिरुद्ध उपासना केंद्राचे अध्यक्ष संभाजी पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य रासू पाटील यांच्यासहीत ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More