खासबाग परिसरातील सुस्थितीतील झाडाची कत्तल : मनपाचा प्रताप !

1 2

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  एकीकडे वृक्ष लावा, वृक्ष जगवा अशी घोषणा द्यायची, पावसाळ्याच्या तोंडावर झाडे लावण्याचे नाटक करायचं आणि दुसरीकडे सुस्थितीत असलेली झाडे कचाकच कापायची असा उद्योग महापालिका करीत असल्याचे समोर आले आहे. खासबाग परिसरातील जुना देवल क्लब इमारतीशेजारी नव्याने झालेल्या ‘द फूड स्पेस’ या दुकानाच्या दारातील सुस्थितीत असलेले झाड आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले. यामुळे वृक्षप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे.

वास्तविक या झाडाची कसलीही अडचण होत नव्हती, उलट या परिसरात गारवा निर्माण करण्याचे काम ते करत होते. हे झाड महापालिका कर्मचाऱ्यांनी कोणाच्या आदेशाने पाडले याचा खुलासा होण्याची गरज आहे महापालिकेची वृक्ष समिती आहे. या समितीने हे झाड तोडायला परवानगी दिली का किंवा त्यांना यासंबंधी माहिती आहे का हे स्पष्ट करण्याची गरज आहे. खरोखरच हे झाड का पाडले याचे उत्तर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी द्यावे अशी मागणी वृक्षप्रेमीतून होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
  1. Arju. Kale says

    Te zaad Mehta yanchya dairy che naav nit disat nasave mhanun kaple asel Karan Mehta atta 100 zade lavnaar asatil kolhapumadhe . Senseless

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More