मोबाईलवर गेम खेळताना मुलाने गमावला डोळा : कागल तालुक्यातील प्रकार

0 2

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने १६ वर्षीय मुलाने डोळा गमावला आहे. अमोल दत्तात्रय पाटील (वय १६) असे त्याचे नाव असून, उंदरवाडी (ता. कागल) येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सर्व मंडळी शेतीच्या कामासाठी गेली असता सकाळी दहाच्या सुमारास अमोल घराच्या उंबरठ्यावर मोबाईलमध्ये गेम खेळत बसला होता. थोड्या वेळाने मोबाईल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. त्या वेळी मोबाईलमधील पार्टचा एक तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. जखमी अमोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोबाईलचा तुकडा लागल्याने अमोलचा डोळा निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मागील काही दिवसांपासून मोबाईलचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More