कोल्हापुरात जनता दलाच्या भूमिकेकडे लक्ष : सोशल मिडियावर पाठिंब्याची अफवा

0 3

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे रणांगण तापू लागले असून राज्यासह जिल्ह्यातील घटक पक्षांना आपल्यासोबत घेण्यासाठी आघाडी आणि  युतीच्या नेत्यांची तारांबळ सुरु आहे. कोल्हापूर मतदारसंघात मंडलिक विरुद्ध महाडिक अशी चुरशीची लढत होत आहे. गडहिंग्लज तालुक्यात जनता दलाचे चांगले वलय आहे. जनता दलाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आघाडी व युती दोन्हीकडून जोरदार प्रयत्न होत असून सर्वांनाच जनता दल कोणाच्या पाठीशी राहणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

आज  (शुक्रवार) सकाळी कोल्हापुर येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत श्रीपतरावजी शिंदे यांची भेट झाली. पण ही भेट खाजगी कामाच्या निमित्ताने होती. लोकसभेच्या कोणत्याही उमेदवारास पाठिंबा द्यायचा अजून निर्णय झाला नसून दोन दिवसात हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जनता दलाच्या प्रमुखांनी ‘लाईव्ह मराठी’ला सांगितले. त्यामुळे या मुद्द्यांवरुन तालुक्यात सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आज शरद पवार आणि श्रीपतराव शिंदे यांच्या भेटीचा फोटो सोशल मिडियावर फिरत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिल्याचा संदेश फिरत असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या गाठी-भेटी जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांच्यासोबत झाल्या आहेत. पण, अद्याप जनता दलाने आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. ये दोन दिवसात जनता दल आपली भूमिका स्पष्ट करेल. त्यामुळे सोशल मिडियावर फिरत असलेला पाठिंब्याचा संदेश ही निव्वळ अफवाच असल्याचे जनता दलाकडून स्पष्ट करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More