कोदवडेच्या अनिल सावंतांनी जपला वृक्ष संवर्धनाचा वसा…

3 1

कळे (प्रतिनिधी) : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती ” असे संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे पर्यावरणाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करणारा तरुण म्हणून कोदवडे (ता.पन्हाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत यांनी वृक्ष संवर्धनाचा एक वेगळा छंद जोपासला आहे.

त्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वःखर्चाने अनेक झाडे लावली. यावेळी डोंगर कपारीतील शेतामध्ये आंबा, काजू, नारळ, फणस, निलगीरी, आफ्रिकन बांबुळ, लिंब, शेवगा, गुलमोहर, सागवन अशा विविध प्रकारच्या झाडांचे रोपन केले आहे. अनिल सावंत यांनी मागील सात वर्षात १५० झाडांचे रोपन करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

3 Comments
  1. Mahesh paradkar says

    Good

  2. ABHIJIT PATIL says

    Salute

  3. Ravasaheb says

    Best of luck bhawa

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More