कोडोलीतील ‘मनुग्राफ’ बंद करण्यास कामगारमंत्र्यांचा नकार

1 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोडोली (ता. पन्हाळा) येथील मनुग्राफ इंडिया लि. बंद करण्यास राज्याचे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी नकार दिला. त्यामुळे कामगार जगतातून समाधान व्यक्त होत आहे. या निकालाकडे उद्योग जगताचे लक्ष लागून राहिले होते.

मनुग्राफच्या व्यवस्थापनाने राज्य शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी इंडस्ट्रीयल डिस्प्यूटस् अॅक्ट १९४७ या कायद्यानुसार अर्ज केला होता. या अर्जावर कामगार मंत्र्यांसमोर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. कामगार संघटनांतर्फे अँड. उदय जाधव यांनी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. अभय नेवगी यांनी सहकार्य केले. मंत्री डॉ. कुटे यांनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची बाजू ऐकून घेतली. कामगारांची बाजू न्याय वाटल्याने त्यांच्या बाजूने निकाल देत व्यवस्थापनाला अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला.

कंपनीच्या २६० कामगारांच्या कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्न अवलंबून होता तसेच कंपनीने सुटे पार्ट पुरवणाऱ्या छोट्या उद्योगांचेही या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. या निकालामुळे कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल लागला असता तर अडचणीत असलेल्या अन्य उद्योजकांनी हाच मार्ग अवलंबून आपले उद्योग बंद केले असते. त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले असते. या निर्णयामुळे कामगारांतून समाधान व्यक्त होत आहे.

संघटनेचे अध्यक्ष मनोहर किबिले, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव आनंदराव लोहार, महादेव पाटील, राजेंद्र पाडळे, संजय पाटील, रमजान जमादार, संजय थोरवत, प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेवून संघटनेची बाजू ठामपणे मांडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
  1. C B Kelkar says

    Now it should be seen that management does not take revenge and harass workers .

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More