केरळमध्ये ‘निपाह’चा रुग्ण आढळला ; आरोग्य विभागाकडून खबरदारीची सूचना

0 4

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मिळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळले आहेत. यातील ८६ जणांना आरोग्य विभागाने देखरेखीखाली ठेवले आहे. या सर्व रुग्णांना निपाह विषाणूची बाधा झाल्याचा संशय असून वैद्यकीय अहवालानंतरच चित्र स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

केरळमधील एर्नाकुलम येथील २३ वर्षीय तरुणाला निपाह विषाणूची बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. निपाह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना राबवल्या आहेत, असे आरोग्यमंत्री के. के. शैलेजा यांनी स्पष्ट केले आहे.

‘निपाह’ विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. नागरिकांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनाही विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपाह विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यावा. तसेच सोशल मिडीयावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही विभागाने म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More