काश्मीरमध्ये इसिसच्या कमांडरचा सुरक्षा दलांकडून खातमा

0 1

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. यावेळी दहशतवाद्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी आज (शुक्रवारी) पहाटे परिसरात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. यादरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे.

शोपियाँतील अमशीपोरा येथे ही चकमक झाली. इश्फाक अहमद सोफी उर्फ अब्दुल्ला भाई असे या दहशतवाद्याचे नाव आहे. इश्फाक हा आयसिसचा जम्मू- काश्मीरमधील एकमेव कमांडर होता. त्याचा खात्मा झाल्याने इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर या दहशतवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.

इश्फाक सोफी हा २०१५ मध्ये हरकुतूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. यानंतर २०१६ मध्ये तो इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर या संघटनेत सामील झाला होता. आता तो आयएसजेके टॉप कमांडर होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More