एसटीचा प्रवाशांना आणखी एक दणका : सामान भाड्यात वाढ

0 3

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरातील प्रत्येक विभागातील एसटी बसमधून प्रवास करताना २० किलोवरील सामानासाठी पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केला. सामानाच्या तिकिटाचे किमान भाडे पाच ते १०० रुपयांपर्यंत किमीनुसार आकारण्यात येणार असून २७ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळाने २० किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय नुकताच घेतला. हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगाराला कळविण्यात आला आहे. प्रत्येक आगारातील फलकावर याबाबतची पत्रक लावण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. महामंडळाने जून २०१९ मध्ये प्रवासी भाड्यात वाढ केली होती. त्यानंतर आता सामानाच्या भाड्यात वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना जादा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More