इचलकंजीत जुगार अड्ड्यावर छापा : १९ जणांना अटक

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथे जवाहरनगरमध्ये बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून हा अड्डा चालवणाऱ्या दोघांसह १९ जणांना पोलीसांनी आज (शनिवार) अटक केली आहे. याठिकाणी रोख १ लाख ७ हजार रुपयांसह २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेच्या पथकाने केली.

इचलकरंजी येथील जवाहरनगरातील संतोष श्रीकांत जाधव हा आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर भरत आरगेसह जुगारअड्डा चालवत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. स.पो.नि. संतोष पवार आणि फौजदार दादाराजे पवार यांनी पथकाच्या सहाय्याने याठिकाणी धाड टाकून पत्त्याचा अंदर-बाहर जुगार खेळत असताना गोरख सुतार, निलेश काळे, सलीम मुजावर, नुरुल ओडीमार, विनायक भंडारे, रौनक मेहता, शरफुद्दीन मुश्रीफ, रब्बानी कुडचीकर, रमेश घोरपडे, अतिष कांबळे, सचिन चौगले, धनंजय सावंत, मनिष तिवारी, मुबारक तांबोळी, अमर बुगड, सुनिल कुंभार, शंकर खांडेकर यांना अटक केली.

याठिकाणी रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य असा २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहाय्यक फौजदार नेताजी डोंगरे, हवालदार गुलाब चौगुले, श्रीकांत मोहिते, अर्जुन बंद्रे, कृष्णात पिंगळे आदींनी भाग घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More