इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास घातला बुरखा ; उत्तर प्रदेशमध्ये तणाव

0 3

लखनऊ (वृत्तसंस्था) :  उत्तर प्रदेशातील खीरी – गोला (लखीमपूर) येथील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला अज्ञात व्यक्तिने बुरखा घातला. त्यामुळे परिसरात सद्या तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्ते प्रचंड भडकले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.

घटनास्थळी धाव घेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला. शिवाय, जोरदार घोषणाबाजी देखील केली. पण, पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर पोलिसांनी पुतळ्यावर घातलेला बुरखा उतवला असून परिस्थितीवर देखील नियंत्रण मिळवलं आहे. हे कृत्य नेमकं केलं कुणी ? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. त्यादृष्टीनं आता तपासाला देखील सुरूवात करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More