आशा वर्कर्सचे सात ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन…

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी राबवावे, अशा वर्कर्सना कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी. १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे. एनआरएचएमचे खाजगीकरण बंद करावे. यासह १६ मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ७ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नेत्रदिपा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आशा आणि गट प्रवर्तकांच्या प्रयत्नामुळे बाल मृत्यू आणि माता मृत्यू प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नवजात बालकांचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले आहे. मात्र, या आशा वर्कर्सन शासनाकडून न्याय मिळत नाही. अन्य राज्याच्या तुलनेत आशा वर्कर्सना तुटपुंज मानधन मिळते. यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनासाठी राज्य शासनाने समान वाटा उचलावा. आशांना विना मोबदला काम सांगू नये, प्रवासी व संबंधित भत्ते द्यावेत. ५ हजाराची दिवाळी भेट द्यावी. स्टेशनरीसाठी २०० रुपये द्यावेत. तसेच गटप्रवर्तकासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात खुर्ची, टेबल, कपाट आणि स्वतंत्र संगणकाची सोय करावी. मोबाईल भत्ता ५०० रुपये द्यावे. मातृत्व लाभ आणि प्रसूती रजेची सुविधा द्यावी अशा यांच्या मागण्या आहेत.

यावेळी चंद्रकांत यादव, सचिव उज्वला पाटील, वसुधा बोडके, ज्योती तावरे, शुभांगी बनकर, पूनम माळी, सुरेखा मोहिते, मनीषा पाटील यासह आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More