आयुक्तांचा आवाहनाला प्रतिसाद देत मनपात स्वच्छता मोहिम…

0 6

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका आयु्क्त डॉ. एम.एस.कलशेट्टी हे स्वच्छते संबंधी अधिक सजग आहेत. आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून त्यांनी शहराबरोबरच महापालिकेतही स्वच्छता असावी, असा आग्रह धरला आहे.

स्वच्छ व सुंदर कोल्हापूर हे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरु आहे. आज (मंगळवार) संत तुकडोजी महाराज यांची जयंती होती. त्यानिमित्त त्यांनी महापालिकेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. महापालिकेतील सर्व विभागात स्वच्छता मोहिम राबवावी, असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केले होते.

सर्व साधारण असून देखील त्याला प्रतिसाद देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या विभागात स्वच्छता मोहिम राबवून विभाग चकाचक केला. दोन दिवसांपूर्वीच कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगा घाट परिसरात महापालिका व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी स्वच्छता मोहिम राबवली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More