आता ‘जीआयबीएफ’ कोल्हापुरात : उद्योजकांचा होणार सन्मान

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे (जीआयबीएफ) व्यासपीठ शहरात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेचेही नियोजन करण्यात आले आहे.

कोल्हापुरी उद्योग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जावा यासाठी हे व्यासपीठ काम करणार असून फोरमच्या वतीने १० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता हॉटेल सयाजी येथे स्थानिक उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५ उद्योजकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हॉटेल सयाजी येथे दुपारी २ ते ५ या वेळेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेला इथोपिया आणि इआय सालवेडोर देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित राहणार आहेत. गोशिमा आणि कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्सनेही यात पुढाकार घेतला आहे.

जीआयबीएफचे जगभरात  २७ देशात जाळे पसरले असून ५३ लाख सभासद आहेत. जागतिक मुख्यालय दुबई येथे तर देशातील मुख्यालय नवी दिल्ली व कार्पोरेट कार्यालय पुण्यात आहे. या फोरमच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील उद्योजकांशी व्यावसायिक भागीदारी करण्याची संधी मिळणार असल्याचे यावेळी डॉ. जितेंद्र जोशी यांनी सांगितले.

यावेळी निखील ओसवाल, दिपाली गडकरी, लक्ष्मीदास पटेल, संजय शेटे, शीतल केतकळे, अभिषेक जोशी आदी उपस्थित होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More