आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये भारताचे वर्चस्व कायम

0 1

नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत वर्ल्ड कपवर नाव कोरले. महिला आणि पुरुष संघांनी अंतिम सामन्यात धडक मारली होती. मलेशियातील मलेकात सात दिवसीय कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ३२ देशांनी सहभाग नोंदवला होता.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि. सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

कबड्डी वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परतलेल्या संघाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही संघांचे जल्लोषी स्वागत झाले. अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष संघाचा सामना इराकसोबत होता. भारताने या सामन्यात ५७-२७ अशा गुण फरकाने एकतर्फी विजय मिळवला. महिला संघानेसुद्धा जबरदस्त कामगिरी करत तैवानच्या महिला संघाला ४७-२९ अशा फरकाने पराभूत केलं.

वर्ल्ड कप जिंकून भारतात परतल्यानंतर भारताच्या महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षक संजीव ठाकुर म्हणाले की, दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी करत वर्ल्ड कप जिंकला. आगामी काळात कबड्डी आणखी लोकप्रिय होईल. आता कबड्डी खेळ राहिला नसून त्याच्याकडे करिअर म्हणून बघितलं जात असल्याचे ते म्हणाले.

भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार अमरजीतने अंतिम सामन्यात १९ रेड पॉईंट कमावले. त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. विजयानंतर अमरजीत म्हणाला की, संघातील खेळाडूंच्या मेहनतीचं हे फळ आहे. सर्व खेळाडू एक होऊन खेळले म्हणून वर्ल्ड कप जिंकता आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More