अनेकांना गंडा घालणाऱ्या सापळेला पाच दिवसांची पोलिस कोठडी

0 2

मुरगूड (प्रतिनिधी) : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि लाखो रुपयांचे सोने खरेदीसाठी बनावट धनादेश देऊन जिल्ह्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या सचिन सापळे यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणांचा लवकरच छडा लागेल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी व्यक्त केला. 

कागल तालुक्यातील सोनाळी येथील सुवर्णकार रमेश पोतदार यांच्यासह दोघा चुलत भावांना  १५ लाख,५६ हजार २७७ रुपयाच्या  रकमेचा खोटा धनादेश देवुन  गंडा घातल्या प्रकरणी सचिन सापळे यास मुरगूड पोलिसांनी अटक केली होती. त्यास कागलचे  प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी सापळे यांने पोतदार बंधूला दिलेला धनादेश बनावट असल्याचे  उघडकीस आले असता, याबाबत जाब विचारायला गेल्यावर पोतदार यांना आरोपी सापळे यांने धमकी दिली होती. याबाबतची फिर्याद पोतदार यांनी मुरगूड पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास स. पो. नि. भगवान शिंदे करीत आहेत. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More