अखेर राजनाथ सिंह यांना मिळाले कॅबिनेट समित्यांमध्ये स्थान…

0 3

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळी कॅबिनेट प्रकरणं हाताळण्यासाठी आठ समित्या स्थापन केल्या आहेत. या आठही समित्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश होता. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना दोनच समित्यांमध्ये स्थान मिळाले होते. आता मात्र राजनाथ सिंह यांना सहा समित्यांमध्ये सहभागी करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आले आहे.

यावेळी माध्यमास राजकीय वर्तुळामध्ये राजनाथ सिंह यांचे वजन ‘मोदी-शाह सरकार’च्या काळात कमी झालंय का ? असा सूर उमटला. त्यानंतर काही तासांतच कॅबिनेट समित्यांची एक नवी यादी तयार करण्यात आली. या यादीत
राजनाथ सिंह यांना सहा समित्यांमध्ये स्थान देण्यात आल्याची माहिती मिळाली.

अमित शाह हे २०१९ साली पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढून संसदेत पोहचलेत. त्यांचा समावेश आठही समित्यांमध्ये करण्यात आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा कॅबिनेट समित्यांचा भाग आहेत. यातील सर्वात जास्त म्हणजे सात कॅबिनेट समित्यांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा समित्यांत, पीयूष गोयल यांचा पाच समित्यांत तर नितीन गडकरी, नरेंद्र सिंह तोमर यांचा चार-चार समित्यांत समावेश करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More