अकोल्यात मतदारांने ईव्हीएम मशीन फोडलं

0 1

अकोला (प्रतिनिधी) : अकोला मतदारसंघात एका मतदाराने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे. ईव्हीएम फोडणाऱ्या श्रीकृष्ण घ्यारे या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळापूर तालुक्यातील कवठा मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे.

ईव्हीएम फोडल्याची घटनासमोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी श्रीकृष्ण प्यारे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर या मतदान केंद्रावर नवीन ईव्हीएम देण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पण काही ठिकाणी मात्र मतदानावेळी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. भोकर, नायगाव, मुखेड, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर या ठिकाणी एकूण ७८ मशीन बंद पडल्या. त्यानंतर प्रशासनाने या मशीन्स बदलल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More